राजकीय

वैरागची मतदान केंद्रे बदलावीत -अरूण सावंत

साद मराठी न्यूज टीम :

वैरागची मतदान केंद्र बदलावीत

वैराग नगरपंचायत सार्वजनिक निवडणूक २०२१ च्या होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकूण १७ मतदान केंद्र आहेत. यापैकी प्रभाग क्रमांक एक, प्रभाग क्रमांक चार, प्रभाग क्रमांक पाच, प्रभाग क्रमांक सहा, प्रभाग क्रमांक सात या भागातील सर्व नागरिकांचे मतदान हे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, विद्या मंदिर कन्या प्रशाला व विद्या मंदिर हायस्कूल येथे आहे . ह्या प्रभावापासून ते मतदानाचे केंद्र हे अंतर साधारण एक किलोमीटर इतके असून तिथे जाण्यास मतदारांची गैरसोय होऊन मतदानाची टक्केवारी घटू शकते तरी त्यांच्या सोयीसाठी व मतदारांच्या टक्केवारी वाढवण्यासाठी या प्रभाग क्रमांक सहा व सात या प्रभागात जवळ असणारे मतदान केंद्र म्हणून जिल्हा परिषद उर्दू शाळा सावंत गल्ली आणि प्रभाग क्रमांक एक, प्रभाग क्रमांक चार ,प्रभाग क्रमांक पाच या प्रभागासाठी मतदान केंद्र नवीन मराठी प्राथमिक शाळा दत्तनगर वैराग येथे करण्यात यावे अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण भगवान सावंत यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विना पवार यांच्याकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button