राजकीय

निवडणूक लढवताय ! मग दोन डोस घेणे गरजेचे, अन्यथा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत !

साद मराठी न्यूज........ साद मराठी..... नाद मराठी .

साद मराठी न्यूज टिम :

वैराग : वैराग नगरपंचायत निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्यापासून ते मतमोजणी प्रक्रिया पर्यंत कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्याचे उल्लंघन केल्यास जागेवरच कारवाई केली जाईल असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी यावेळी दिला असून दोन डोस न घेणाऱ्यांचे नामनिर्देशनपत्रही स्विकारणार नाही, असे दै पुण्यनगरीशी बोलताना त्यांनी सांगितले…….अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी वैराग नगरपंचायतीमधून २१ इच्छूकांनी अर्ज नेले आहेत, मात्र एकही अर्ज दाखल केलेला नाही. एक डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीत अर्ज भरण्याची मुदत आहे. चार व पाच डिसेंबरला सुट्टी असुन उर्वरित पाच दिवसात अर्ज खरेदी करताना अथवा भरताना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. निवडणूक कक्षात उमेदवारांसह एकूण पाच जणांना प्रवेश देण्यात येणार आहे. अपक्ष उमेदवारांना पाच तर राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवार एक सूचक आवश्यक आहे.अर्ज भरताना जात पडताळणी पत्र आवश्यक असणार आहे. राखीव उमेदवारास पाचशे रुपये तर सर्वसाधारण उमेदवारास एक हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. आठ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी १३ डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची, मुदत चिन्हांचे वाटप आणि २१ डिसेंबरला मतदान होईल तर २२डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून जाहीर सभांना ही मर्यादा राहणार आहेत.खुल्या जागेत त्यांच्या २५ टक्के बंदी जागेत क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती असावी लागणार आहे. सभेला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना देखील लसीकरणाचे दोन डोस पूर्ण होणे गरजेचे आहे डोस न घेता जर उपस्थित राहिल्याचे निदर्शणास आले तर आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून ५o हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात येणार आहे. असे प्रांत अधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले. यावेळी मुख्याधिकारी वीना पवार, नायब तहसिलदार संजिवन मुंढे उपस्थित होते….

सतरा मतदान केंद्रांमध्ये १४ हजार ७६२ मतदारांची संख्या आहे.वैराग शहरातील१७ प्रभागांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १७ मतदान केंद्र असणार आहेत. यामध्ये सात हजार ५६१ पुरुष तर ७ हजार २०० महिला आणि एक तृतीयपंथी असे एकूण १४ हजार ७६२ मतदार आहेत. या १७ नगरसेवकांमधून नऊ महिलांना संधी मिळणार असून आठ पुरुष निवडून येणार आहेत…


मतमोजणी वैरागमध्येच होणार: -यापूर्वी वैराग ग्रामपंचायतीसह प्रत्येक निवडणुकीची मतमोजणी ही बार्शीच्या गोडाऊन मध्येच होत आली आहे, मात्र प्रथमच निवडणूक होत असलेल्या वैराग नगरपंचायतीची मतमोजणी देखील वैराग मध्ये पहिल्यांदाच होणार आहे त्यासाठी प्रांताधिकारी हेमंत निकम आणि मुख्याधिकारी विना पवार प्रयत्नशील असून मतमोजणी पूर्वी तीन दिवस अगोदर स्थळ घोषित केले जाणार आहे. ….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button