राजकीय

वैराग नगरपंचायतच्या शिवसेना लढणार सर्व जागा :वानकर, दोन्ही पर्याय उपलब्ध : सोपल….

साद मराठी न्यूज नेटवर्क :

वैराग : वैराग नगरपंचायतीची निवडणूक जसजशी रंगात येईल तस तसा राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याचा प्रत्यय नुकताच आला असून वैराग नगरपंचायतीची निवडणुक शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवली जाणार असल्याचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी  सांगितले. मात्र लोकशाही संघ पक्षाचे प्रमुख तथा शिवसेनेचे नेते माजी मंत्री दिलीप सोपल यांनी राज्यस्तरावरून जर काही वेगळा निर्णय झाला तर ऐनवेळीच्या घडामोडीसाठी लोकशाही संघ पक्ष आघाडी व शिवसेना हे दोन्ही पर्याय उपलब्ध ठेवले असल्याचे सांगितले…..माजी मंत्री दिलीप सोपल, ग्रहनिर्माणचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे आणि भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही संघ पक्ष स्थापन करण्यात आला आहे. या लोकशाही संघ पक्षाच्यावतीने वैराग मधील नगर पंचायतीची निवडणूक लढविण्यात येत आहे. अशा वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी बार्शी येथे माजी आमदार दिलीप सोपल, भाऊसाहेब आंधळकर यांची भेट घेऊन पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी वैराग येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

वैरागची निवडणुक शिवसेना धनुष्यबाण याचिन्हावर १७ जागा लढवणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना महाविकास आघाडी सरकार म्हणून लोकहिताचे निर्णय घेतले. या निर्णयांच्या बळावर नगरपंचायतीच्या विकासासाठी निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार आहे. महाराष्ट्र शासनाचा कारभार महाविकास आघाडीच्या माध्यमातून चालतो. वैराग नगरपंचायत निवडणुकीसाठी मित्रपक्षाच्या वरिष्ठांना महाविकास आघाडीचा प्रस्ताव देण्यात आला होता . मात्र स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी बाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही .आता आमच्या शिवसेनेची ताकत दाखवून देण्यासाठी आम्ही निवडणुक लढवणार आणि जिंकूनही येणार असे वानकर शेवटी म्हणाले . वानकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवेळी शिवसेना तालुका प्रमुख अमोल काकडे , वैराग शिवसेना शहराध्यक्ष संतोष गणेचारी, सुनिल धोकटे, श्रीकांत गणेचारी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते .याबाबत शिवसेना नेते माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी संपर्क साधला असता सोपल म्हणाले की, लोकशाही संघ पक्ष हा आघाडीतील सर्व घटकांना एकत्रित घेऊन निवडणूक लढवण्यासाठी स्थापन केलेला आहे, मात्र सध्या शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवावी असे आमच्या बैठकीतून ठरले आहे .यानंतरही आघाडीचे सरकार असल्याने ऐनवेळी राज्यस्तरावरून काही निर्णय झाले तर स्थानिक पातळीवर तात्काळ बदल करता यावा यासाठी लोकशाही संघ पक्ष आणि शिवसेना अशा दोन्ही माध्यमातून उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहेत यावेळी अरुण कापसे , तेजस्विनी मरोड , अरुण सावंत , किशोर देशमुख , आबासाहेब देवकर , समीर शेख आदी उपस्थित होते …..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button