राजकीय
भारतीय जनता पार्टीच्या वतीने पहिला उमेदवारी अर्ज शाहू राजे निंबाळकर यांच्या रूपाने दाखल…………

साद मराठी न्यूज नेटवर्क :
नव्याने अस्तित्वात आलेल्या वैराग नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक होत आहे. वैराग नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी पहिला अर्ज म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने शाहूराजे संतोष निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम, मुख्याधिकारी विना पवार नायब तहसीलदार संजीवन मुंडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्त करण्यात आला. शाहूराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत माजी शिक्षण व आरोग्य सभापती मकरंद निंबाळकर
मा. ग्रांप सदस्य वैजिनाथ आदमाने, नानासाहेब धायगुडे, शिवाजी सुळे,भाऊसाहेब जाधव, चंद्रकांत खेंदाड , महेश गुंजाळ , बालाजी शिनगारे ,नितीन पानबुडे, वैभव खेंदाड, जिन्नस उमाप आदी मान्यवर उपस्थित होते.
