राजकीय

महिला आणि बेरोजगारांसाठी करणार काम – निरंजन भूमकर…….

साद मराठी न्यूज नेटवर्क :

वैराग नगरपंचायतीची रणधुमाळी आज संपत असून प्रत्यक्ष मतदान करण्याची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान प्रत्येक पक्षांनी आप आपला अजेंडा जनतेसमोर मांडलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते निरंजन भुमकर यांनी आम्ही जर सत्तेत आलो तर महिलांसाठी, बेरोजगारांसाठी आणि सामान्य जनतेसाठी विशेष कार्य करू असे साद मराठी न्यूजशी बोलताना सांगितले……. वैराग ही माझी कर्मभूमी असून वैराग मधील सामान्य नागरिकाचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे. जेव्हा सर्वसामान्यांचा विकास होईल तेव्हाच वैराग भागाचा विकास होऊ शकतो हे मी चांगले जाणून असल्यामुळे माझ्या विकासाच्या स्थानी सर्वसामान्य व्यक्ती राहणार आहेत असेही निरंजन भुमकर यांनी सांगितले. श्री संतनाथ सहकारी साखर कारखाना जर चालू असता तर वैरागची बाजारपेठ देखील फुलली असती, मात्र कारखाना बंद असल्यामुळे वैराग भागाची अधोगती झालेली आहे. त्यामुळे येत्या काळात वैरागचा संतनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचे माझे प्रथम कर्तव्य असेल असेही निरंजन भुमकर यांनी यावेळी सांगितले……

काय म्हणाले निरंजन भूमकर पहा खालील लिंकवर…

https://photos.app.goo.gl/D77FHCqJLHxyjNvH9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button