वैराग भागात विविध संस्थाकडून पत्रकारांचा गौरव !

साद मराठी न्यूज नेटवर्क :
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा ६जानेवारी जन्मदिन तथा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने वैराग शहरासह भागातील विविध सामाजिक संस्था , शासकीय कार्यालये , पतसंस्था व तसेच मान्यवर व्यक्ती यांचेकडून पत्रकारदिनी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला ….. शेळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थापक लक्ष्मण गायकवाड,पोलीस पाटील ज्ञानदेव नागणे, सुहास अडसूळ, शाहू कचरे, नाना सपाटे, अमोल कचरे, शिवाजी जाधव, सचिन बादगुडे आदी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर सासुरे ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला . यावेळी
सरपंच तात्यासाहेब करंडे, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र आवारे, भाऊसाहेब आवारे,प्रशांत भारती, फुलचंद आवारे, देविदास करंडे, सादिक शेख, महादेव आवारे, मीना सय्यद, बालाजी आवारे, प्रताप करंडे, बाळासाहेब पाटील, सूरज करंडे आदी उपस्थित होते. लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.यावेळी विभागीय अधिकारी नितीन म्हेत्रे, शाखाधिकारी अमोल साठे, आशितोष शिखरे, धनंजय मोरे, दिपाली कापसे, सोनाली जगताप यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. बार्शी तालुका राष्ट्रवादीच्या वतीने निरंजन भूमकर,राजकुमार पौळ, प्रशांत भालशंकर, खंडेराया घोडके, नागनाथ वाघ, नाना रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेच्या वतीने देखील वैराग भागातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी सभापती मकरंद निंबाळकर आप्पा वर्धने, अरुण सावंत, तेजस्वीनी मरोड ,नंदकुमार पांढरमिसे सलीम शेख ,अमर निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते तडवळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने देखील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी वैद्यकीय अधिकारी अनिता बांगर,डॉक्टर निरगुडे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. वैराग पोलीस ठाण्याच्या वतीने वैराग भागातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, यावेळी पोलीस निरीक्षक विनोद बहिर पोलीस उपनिरीक्षक महारुद्र परजणे यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते समाधान पवार, प्रवीण खंदारे, बाबा शेख यांनीदेखील पत्रकारांचा सत्कार केला.
यावेळी किरण आवारे, आनंदकुमार डुरे, कालिदास देवकते,आण्णासाहेब कुरुलकर , भागवत वाघ, राहूल दळवी, रामदास पवार,बलभिम लोखंडे,सुहास ढेकणे, गणेश आडसूळ,संतोष सोनार , मुज्जीम कौठाळकर आदी पत्रकार बंधूचा शाल, श्रीफळ , मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .



