राजकीय

वैराग येथील निरंजन भुमकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नुतन नगरसेवकांचा काटी येथे भव्य सत्कार सोहळा संपन्न…….

साद मराठी न्यूज नेटवर्क :-(उमाजी गायकवाड)

:तुळजापूर तालुक्यातील काटी येथे रविवार दि. 30 रोजी येथील मुख्य बाजार चौकात काटी व खुंटेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध मान्यवरांच्या हस्ते वैराग नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेकांचा सत्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. प्रारंभी फटक्यांच्या आतषबाजी व ढोल ताश्याच्या गजरात बसस्थानक ते बाजार चौका पर्यंत मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.
बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीत निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत आणि माजी मंत्री दिलीप सोपल या दोन्ही मातब्बर नेत्यांना धोबीपछाड देत 17 पैकी 13 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकून दणदणीत विजय मिळवत नगरपंचायतीची सत्ता आपल्या ताब्यात घेत नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीवर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा लावला. या निवडणुकीत भाजपला फक्त चार जागेवर समाधान मानावे लागले तर शिवसेना नेते दिलीप सोपल गटाला आपलं खातंही उघडता आलं नाही.
वैराग नगर पंचायतीवर पहिल्यांदाच तरुण युवक निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा लावला. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभाग उस्मानाबादचे जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर शेख,युवक नेतृत्व मोहन जाधव व महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, माजी सरपंच शामराव आगलावे आदी पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने जंगी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळीराम (काका) साठे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील,प्रदेश उपाध्यक्ष मसूद भाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रस्ताविकपर भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर शेख यांनी नवनिर्वाचित नगरसेविकांचे कौतुक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निरंजन भूमकर त्यांचे सहकारी नवनिर्वाचित नगरसेवक यांचा शाल,फेटा, पुष्पहार घालून सत्कार करण्यात येऊन वैराग शहराच्या विकासासाठी चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सत्काराला उत्तर देताना युवा नेते तथा नुतन नगरसेवक निरंजन भूमकर म्हणाले की, हा विजय धनशक्तीवर जनशक्तीचा विजय आहे, हा विजय हुकुमशाहीवर लोकशाहीचा, तिरस्कारावर प्रेमाचा, अहंकारावर नम्रतेचा, धर्मांध जातीयवादी विचारधारेवर धर्मनिरपेक्षतेचा विजय असल्याचे सांगून नागरिकांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नसल्याचे अभिवचन देऊन यापुढे माझे वैराग मी वैरागचा हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून वैराग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास दिला.

जाहिरात

चौकट…..
ऐतिहासिक ग्रंथाचे वाटप…
शेतकरी सेवा संघाचे ॲड. हणमंत जाधव यांच्या वतीने व्यासपीठावरील मान्यवरांना राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावरील ऐतिहासिक ग्रंथाचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना शेतकरी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी शहर सचिव ॲड. हणमंतराव जाधव यांनी कार्यकर्ता कसा असावा याविषयी मार्गदर्शन करताना म्हणाले की, “पक्ष खंबीरपणे उभा करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी गांभिर्याने घ्यायला हवे. यासाठी सभासद नोंदणी अधिकाधिक करावी. लोकसंग्रह वाढवला पाहिजे.पक्षांतर्गंत मतभेद विसरायला हवे,तालुका कार्यकारिणी सक्षम करून बुथ समित्यांची उभारणी करावी.” कार्यकर्ता कसा असावा, लोकांची आवश्यकता काय आहे, संघटनेचे काम कसे करावे या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळीराम (काका) साठे ,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मसूद भाई शेख,धिरज पाटील, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, माजी उपसरपंच बाबुमियॉं काझी, राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे कार्याध्यक्ष जुबेर शेख,राष्ट्रवादी युवक नेते मोहन जाधव, तुळजापूरची माजी नगरसेवक बबलू सूर्यवंशी,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके,नितीन आबा रोचकरी,गोरख पवार, अमर चोपदार,गोरख पवार, जिल्हा कार्याध्यक्ष तोफिक शेख, अल्पसंख्याक विभाग तालुकाध्यक्ष फेरोज भाई पठाण, वाहिद शेख ,बाबा काशीद,अँड हणमंत जाधव,सचिन काळे, रामेश्वर लाडूकर,बळी चवळे,शाखा अध्यक्ष धनाजी गायकवाड, करीम बेग, अहमद पठाण, भैरी काळे, मधुकर साळुंखे,आयुब पठाण, बाबा काशीद,रघुनाथ वाडकर,किशोर मिर्जे,जीवन पाटील,आदम शेख,हमीद शेख, रोहन जाधव,समीर शेख, शिवलिंग घाणे,नामदेव काळे,कय्युम कुरेशी,सिकंदर कुरेशी कालू कुरेशी,चंद्रकांत काटे सयाजीराव देशमुख,संतोष उबाळे,नाबाजी ढगे ,राजेंद्र गाटे आदी मान्यवरांसह काटी जिल्हा परिषद गटातील महा विकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दिमाखदार सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन जुबेर शेख यांनी केले तर आभार मोहन जाधव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button