राजकीय

शेळगाव ( आर ) गटातून नागेश चव्हाण यांची चर्चा

साद मराठी न्यूज नेटवर्क :

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची चर्चा आता चांगलीच रंगू लागली आहे. बार्शी तालुक्यामध्ये नव्याने झालेल्या शेळगाव (आर ) गटातून उमेदवारी करिता जवळगावचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते व्यवसायिक नागेश चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून सदर निवडणूक चव्हाण यांनी लढवावी यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह वाढू लागला आहे. नागेश चव्हाण यांनी वैराग भागातील अनेक गावातील समस्या चांगल्या पद्धतीने सोडविल्या आहेत, त्यांचे बालपण या भागातच गेले असल्याने त्यांना अनेक प्रश्नांची जाण आहे. सध्या ते पुण्यात आपला व्यवसाय जोमाने करीत आहेत .त्यांना वैराग भागात काही अडचणी आल्यास ते स्वत : जातीने लक्ष घालून सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. नागेश चव्हाण यांनी अनेक सामाजिक संघटनांसोबत विविध पदांवर काम केलेले आहे. सध्या ते सोलापूर जिल्हा रहिवासी संघटनेच्या माध्यमातून राज्यात १०९ शाखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत सामाजिक कार्य करीत आहेत.यापूर्वी त्यांनी बार्शी विधानसभेची निवडणूक लढवली आहे.सध्या राष्ट्रवादी माथाडी कामगार संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदाची ते जबाबदारी यशस्वीरीत्या आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, माथाडी कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष उमेशदादा पाटील, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष काकासाहेब साठे आणि राष्ट्रवादीचे नेते निरंजन भुमकर यांच्या सहकार्याने वाड्या-वस्त्या यांसह गावांचा विकास होण्यासाठी आणि समस्या दूर करण्यासाठी नागेश चव्हाण यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्ते करीत आहेत.

राज्यात १०९ शाखा कार्यरत असून सामाजिक प्रश्नांतून मार्गही काढण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहे.” एकच कॉल प्रॉब्लेम सॉल ” हे ब्रीद वाक्य कायम ठेवून कोणतीही अपेक्षा न ठेवता मध्यरात्रीही मदतीला धावून जाण्याचे कार्य सोलापूर जिल्हा रहिवासी संघटना पार पाडत आहे.अठरा पगड जातीच्या मावळ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या छावा संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पद संभाळल्यानंतर नियोजन, अभिप्रेरण, संघटन प्रभावीपणे राबवत असल्याने छावा संघटनेच्या सध्या महाराष्ट्र राज्य सचिव पदाची जबाबदारी पार पाडत आहे.तर मानव संसाधन विकास संस्था ( ह्युमन राईट ) ह्या सेवाभावी सामाजिक संघटनेची ध्येयधोरणे समाज्यामध्ये रुजवून वाढवणे व समाजहिताचे कार्य करण्यासाठी
पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. सामाजिक कार्याला जर राजकारणाची जोड असेल तर समाजकरण करून गती आणि परिवर्तन दोन्ही एकाच वेळी साधता येऊ शकते, म्हणून ज्यांना सामाजिक संवेदनेची दैवी देणगी लाभलेले आहे. बार्शी तालुक्याची विधानसभा निवडणूक देखील मी लढवली आहे. तुम्ही जिंकला किंवा हरला हे महत्त्वाचे नसून तुम्ही लढला हे महत्त्वाचे आहे. कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. माझे राजकारणातले आजचे वय केवळ दोन वर्ष असून राजकारणात मी अजून बाल्यावस्थेत आहे. लवकरच तारुण्यात प्रदार्पण करीन , तेव्हा आकर्षण ही मी असेन आणि यशस्वीही,खरंतर मला राजकारणापेक्षा सामाजिक कार्याचा पिंड लाभला आहे. माझ्या ह्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि राजकीय विचारमंच असलेल्या जनशक्ती संघटनेच्या युवा आघाडीच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. यातून संघटनेच्या ध्येयधोरणां सोबत समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचून शेतकरी, कामगार,शेतमजूर,महिला, अनाथ, युवावर्ग, विद्यार्थी आणि दिव्यांग,निराधारांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नागेश चव्हाण यांनी सांगितले….
नागेश चव्हाण यांनी सुरू केलेल्या
सोलापूर जिल्हा रहिवासी संघटनेने आजपर्यंत सार्वजनिक कार्यांबरोबर सामाजिक कार्ये देखील पार पाडली आहेत. गाव सोडून रोजगाराच्या शोधात आलेल्यांना रोजगारांसह राहण्याखाण्याची सोय, परगावी आर्थिक अडचणीत सापडलेल्यांसाठी वैद्यकीय मदत, वैरागमधील गरीब मुलीस वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक सहाय्य,जागतिक महिला दिनां निमित्त बचत गटातील महिलांचा गौरव, वैराग शहरासह बसस्थानकात पाणपोईची सोय, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुतळे वाटप, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुतळे वाटप, महावीर गौतम बुद्ध यांची पंचधातूची मुर्ती प्रदान , असिफाच्या न्यायासाठी मूकमोर्चा,जवळगाव मध्यम प्रकल्पामधून गळतीद्वारे वाया जाणारे पाणी थांबवण्यासाठीचे प्रयत्न, वैराग तालुका निर्मितीसाठी महसूलमंत्र्याकडे प्रयत्न, राज्यातील अनेक स्थानके किंवा फुटपाथवर कडाक्याच्या थंडीमध्ये राहणाऱ्या बेवारस व्यक्तींना ब्लॅंकेट वाटून मायेची ऊब देण्याचा प्रयत्न, वाढदिवस वृक्षारोपण करुन साजरा करण्याची परंपरा ,स्वराज्यावर आलेले संकट स्वतःचा जीव धोक्यात घालून रक्षण करणाऱ्या मावळ्यांवर छत्रपती शिवाजी राजांनी अनेक वेळा राज्याचा खजिना रिकामा केला होता. छत्रपती शिवरायांची हीच शिकवण आजही कायम ठेवत सोलापूर जिल्हा रहिवासी संघटनेने शिवजयंती साधेपणाने साजरी करीत शहिदांच्या कुंटुबासाठी तीन लाखांची आर्थिक मदत केली आहे.काश्मिरमधील पुलवामा येथे केंद्रिय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेल्या राज्यातील हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना वैयक्तिकरित्या प्रत्येकी दीड दिड लाखांची मदत देऊ केली आहे
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button