सामाजिक

या मंडळाचा आदर्श इतर मंडळांनीही घ्यावा :डी वाय एस पी नालकुल

साद मराठी न्यूज नेटवर्क :


वैराग (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती समाजाला आदर्शवत आणि समाजासाठी साजरी करणाऱ्या वैराग मधील या मंडळाचा आदर्श इतर शिवजन्मोत्सव मंडळ यांनी सुद्धा घ्यावा असे प्रतिपादन बार्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी वैराग पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित मंडळाच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना केले . यावेळी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनय बहिर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे , अण्णा ग्रुप शिवजन्मोत्सव मंडळाचे वैजिनाथ आदमाने,मेजर जगनाथ आदमाने , महेश पन्हाळे,शिवस्पर्ष प्रतिष्ठानचे स्वप्निल तुपे ,नगरसेवक अजय काळोखे , श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे किरण डिसले ,दादासाहेब मोरे आदी मान्यवरांसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी पुढे बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नाल्कोल म्हणाले की , सलग दोन वर्ष कोरोनामुळे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करता आली नाही .या वर्षी विविध मंडळांनी प्रशासनाने घालून दिलेले नियम व अटी पाळून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली . यातही समाजासाठी आणि समाज उपयोगी काम करणारी शिवजन्मोत्सव मंडळे हे आदर्श ठरत आहेत .याचा आदर्श इतर मंडळी सुद्धा घ्यावा असे शेवटी बोलताना ते म्हणाले .
याप्रसंगी सलग आठ वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करून तब्बल एक हजार वाटल्या रक्त संकलन करणाऱ्या अण्णा ग्रुप शिवजन्मोत्सव मंडळ ,सलग सहा वर्ष रक्तदान शिबिर आयोजित करून सुमारे पाचशे रक्त वाटल्या संलग्नित करणाऱ्या श्रीमंतयोगी प्रतिष्ठान तर सलग तीन वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करून ुमारे अडीचशे रक्‍त बाटल्यास संकलित करणाऱ्या प्रतिष्ठान या तिन्ही मंडळाचा प्रशस्तीपत्र देऊन डी वाय एस पी जालिंदर नालकुल , पोलीस निरीक्षक विनय बहिर , सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी आनंदकुमार डुरे , सपोनि महारुद्र परजने , उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी आपले विचार व्यक्त केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस कॉन्स्टेबल राम शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पोलीस कॉन्स्टेबल सचिन मुंडे यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैराग पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .

जाहीरात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button