विशेष

छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषण सोडले, उद्याचे वैराग बंद आंदोलन मागे……..

साद मराठी न्यूज नेटवर्क:
मराठा आरक्षणसंदर्भात आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे आझाद मैदानावर उपोषणास बसले होते. राज्यातील लोकांची वाढती तीव्रता लक्षात घेता, सरकारमधील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संभाजीराजेंची भेट घेतली होती.
आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनी आंदोलनस्थळी भेट घेतल्यानंतर संभाजीराजेंनी उपोषण सोडलं आहे. यावेळी, आपण ठेवलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. त्यामुळे वैराग येथे उद्या होणारे वैराग बंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे सकल मराठा आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले आहे… आझाद मैदानावर गृहमंत्री वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांचेसह मराठा समन्वयकांशी चर्चा करून छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. परंतु संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमलबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले होते.
त्यानंतर, माध्यमांशी बोलताना वळसेपाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं सांगितलं. आज, मुख्यमंत्र्यांच्यावतीने मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर, संभाजीराजें आणि संयोगिताराजे यांनी ज्युस घेऊन उपोषण सोडले.
त्यामुळे वैराग येथे होणारे आंदोलन आणि वैराग बंद मागे घेण्यात आले आहे…..

जाहीरात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button