सामाजिक

मोहोळ चौकाजवळचा रस्ता व गटार अर्धवट, रस्ता पुर्ण करण्याची मागणी …………

साद न्यूज मराठी नेटवर्क :

वैराग ( ता. बार्शी ) शहरात गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सोलापूर -बार्शी रोडच्या नूतणीकरणाचे काम चालू आहे. वैरागमधील मुख्य असणाऱ्या मोहोळ चौकाजवळील मातोश्री मंगल कार्यालया शेजारी गेल्या तीन चार महिन्यापासून रस्ता व गटारीचे काम अपुर्ण ठेवले आहे. त्यामुळे पौळ गल्लीतील गटारीचे पाणी रस्त्यावरच साचत आहे .अनेक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तो रस्ता व गटारीचे काम पुर्ण करावे अशी मागणी वैरागच्या नागरिकांनी केली आहे .

सोलापूर -बार्शी रोडचे नूतनीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे . सध्या काम अंतीम टप्प्यात आले आहे . मात्र वैराग शहरात मोहोळ रोड व मातोश्री मंगल जवळ रस्त्याचे व गटारीचे काम पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे .
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत रस्ता खोदाई केल्याने तेथील राहणाऱ्या नागरिकांच्या गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

जाहीरात

वैराग पासून दोन किलोमीटर अतंरावर गटार व रस्ताचे काम आवताडे कन्ट्रक्शने अपुर्ण ठेवले आहे. कन्स्ट्रक्शन च्या कामगारांना या कामाची चौकशी करण्यासाठी फोन केला असता फोन घेऊ शकले नाहीत . त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांना संपर्क केला असता त्यांनी उत्तर दिले की, संबंधित कामाची चौकशी करू व लवकर काम करायला सांगितले आहे असे म्हणाले.

………………….
सोलापूर -बार्शी रोडचे जे नवीन नूतनीकरण चे काम आहे. ते अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र वैराग जवळ असलेले मातोश्री मंगल कार्यालय जवळ जो रस्ता व गटार थांबलेली आहे त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला तात्काळ करायला सांगितली आहे.

सौरभ होनमुटे
सार्वजनिक बांधकाम अभियंता बार्शी
……

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button