सर्वांना सुखी ठेव, भरभरून पाऊस पडू दे…… आमदार राजेंद्र राऊत

साद मराठी न्यूज नेटवर्क :
येणाऱ्या पावसाळ्यात भरभरून वरुणराजाने बरसावे आणि सर्वांना सुखी ठेवावे, अशी विनवणी बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्यातील तडवळे गावचे आराध्य आणि जागृत दैवत श्री भगवती देवीकडे केली आहे…. बार्शी तालुक्यातील भोगावती नदी काठावर वसलेल्या तडवळे गावचे जागृत ग्रामदैवत श्री भगवती देवीचा आराधखाना मोठ्या भक्ती भावाने पार पडत आहे,आज सकाळी बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र राऊत यांनी भगवती देवीचे दर्शन घेऊन तालुक्याच्या सुख आणि समृद्धी साठी देवीकडे साकडे घातले. यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर, वैरागचे माजी ग्रामपंचायत सदस्य नाना धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते .या मान्यवरांचा श्री भगवती देवी सेवा मंडळ आराधी मंडळ, श्री भगवती देवी ट्रस्ट आणि तडवळे ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

देवीच्या दर्शनानंतर आमदार राजेंद्र राऊत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी अनेक अडीअडचणी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासमोर मांडल्या या सर्व समस्यांमधून समाधान मिळवून घेण्याची जबाबदारी आपण पार पाडू असे आश्वासन आमदार राजेंद्र राऊत यांनी तडवळकरांना दिले .तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या अडचणींचे प्रस्ताव तयार करून आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही नक्कीच अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे सांगून आमदार राऊत यांनी गावातील मुख्य मार्गावरून प्रदक्षिणा ग्रामस्थांच्या सोबत मारली……
